पवित्र नात्यावर कलंक | वडिलाचा मुलीवर बलात्कार

290
rape

राहू : बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील (जि. पुणे) वडगाव बांडे येथे घडली आहे. 

स्वतःच्या तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वडिलाने जबरदस्ती करत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी सहा वाजता वडगाव बांडे येथील राहत असलेल्या खोलीत इतर कोणीही नसताना पीडीत मुलीच्या बापाने मुलगी (वय 13 वर्षे, 4 महिने) ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा मुलीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.

संबंधित आरोपीस यवत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री दीड वाजता  ताब्यात घेतले आहे. अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here