भाजप 12 आमदारांच्या निलंबनाविरोधात हायकोर्टात दाद मागणार | आमच्या आमदारांनी शिवीगाळ केलीच नाही : चंद्रकांत पाटील

60

विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले. आज संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व अनागोंदी झाली.

सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये गदारोळ झाला. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. या 12 आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात आपण आता कोर्टात जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांचा अपमान केलेला नाही. भास्कर जाधव यांनी स्वत: शिवीगाळ केली आणि आमच्या आमदारांवर कारवाई झाली.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आम्ही न्यायालयात जाऊन आमदारांच्या निलंबनाविरोधात दाद मागणार आहोत. खोटे कसे बोलायचे हे आपण या सरकारकडून शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजप हा साधा पक्ष नाही, तर १०6 आमदार निवडून आलेला हा पक्ष आहे. आज 106 आमदारांसह पक्षाचा आवाज दाबला गेला आहे.

आम्ही या विरोधात आवाज उठवणार आहोत. निलंबित केलेले १२ आमदार राज्यपालांकडे गेले होते, आता आम्ही हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहोत. हा अन्याय आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळू शकेल असा विश्वास आहे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे देखील वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here