महेश कोठे राष्ट्रवादी प्रवेश | काही तासांमध्येच शरद पवारांचे ट्विट ‘डिलीट’

572
Decisions taken by Sharad Pawar in government |

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठेंनी राष्ट्रवादीच प्रवेश केल्याचं एक ट्विट केलं होतेे.

खुद्द ट्विट करत शरद पवारांनी ती माहिती दिली होती. पण काही तासांमध्येच शरद पवारांनी ते ट्विट डिलीट केले आहे.

शरद पवारांवर ते ट्विट डिलीट करण्याची वेळ का आली, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय.

विशेष म्हणजे महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती.

मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं पवारांनी ट्विट करत माहिती दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

त्यानंतर महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे खुद्द शरद पवारांनीच आधी ट्विट करत महेश कोठेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिली होती. काही वेळात पवारांनी ते ट्विट डिलीट केलं आहे.


महेश कोठे यांचे समर्थक असलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.

नगरसेवक महेश कोठे हे अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती.

अखेर कोठे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

महेश कोठे यांचे निकटवर्तीय समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

रियाज मुमिन, माजी नगरसेवक राज महेंद्र कमकम, युवराज चुंबडकर, सलाम शेख, युवराज सर्वडे, नितीन करवा, शाम पांचारिया, बाजू जमादार, परशुराम भिसे यांनी कोठेंबरोबर राष्ट्रवादी प्रवेश केलाय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here