सचिन तेंडुलकरने हॉलिवूड स्टार रिहानाला फटकारले !

280

मुंबई : शेतकरी आंदोलनाबाबत ट्विटरवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या हॉलिवूड स्टार रिहानाला सचिन तेंडुलकरनं फटकारले आहे. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पॉप स्टार रिहानासह अनेकांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या खासगी प्रश्नावर अनेकांनी दखल देण्याचा प्रयत्न केला. 

मात्र बुधवारी सोशल मीडियावर ट्विट करत सचिन तेंडुलकरने साऱ्यांच तोंड बंद केले आहे. त्यानंतर अनेक खेळाडू, अभिनेते यांनी भारताच्या आंतरिक गोष्टीत नाक खुपसू नको असे लिहिले.

 

  • भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ शकत नाही. बाहेरच्यांनी प्रेक्षक म्हणून पहावं, यामध्ये भाग घेऊ नये. तसेच भारताबाबत काय करायचे ते भारतीय ठरवतील, असा सल्ला सचिननं रिहानाला ट्विटरवरून दिला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून ट्विटरवर काही सवाल उपस्थित केले होते. 

 

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ शकत नसल्याचं सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. बाहेरच्यांनी प्रेक्षक म्हणून पाहावं, मात्र भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खपसू नये असंही सचिननं रिहानाला बजावले.

भारताबाबत काय करायचं ते भारतीय ठरवतील असा सल्लाही सचिननं रिहानाला ट्विटरवरून दिला आहे. सचिनच्या एका ट्विटनंतर अनेकांनी रेहानावर टीका करायला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here