नाशिक : देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात नाशिकमध्ये एक संतापजन कृत्य घडलं आहे.
नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून शेजाऱ्यांनीच बलात्कार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार पीडितेचे आई-वडील मजुरी करतात.
आई-वडील घरात नसताना हा प्रकार घडला असल्याचं समोर येत आहे. सायंकाळी ते परतल्यानंतर १३ वर्षाची मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी पीडिता भयभीत अवस्थेत आढळून आली.
आठवडाभरापूर्वी सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आईने विश्वासात घेवून मुलीची विचारपूस केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.