कर्नाटक : १५ वर्षांच्या मुलीवर सलग ५ महिने १७ जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्नाटक राज्यामध्ये घडलेली आहे. या गुन्ह्यामध्ये मुलीची मावशी मुख्य ‘सूत्रधार’ आहे.
यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारीला जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी १७ जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
यामध्ये अटक केलेल्या आरोपींवर लैंगिक अत्याचार आणि तस्करीचाही गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी हा दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत होती.
काम करत असताना गिरीष नावाच्या एका एसटी ड्रायव्हरबरोबर तिची ओळख झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गिरीशने पीडिताचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला.
त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर, अभीने पीडिताचे फोटो आणि व्हिडीओ काढले अन् ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्याही मित्रांनीही पीडितेवर वारंवार बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडिताची आईचा मृत्यू झाल्यामुळे मागील ३ वर्षांपासून पीडिता ही मावशीसोबत राहत होती. मुलीवर वारंवार बलात्कार होत आहे, मावशीला माहिती होतं. म्हणून पोलिसांनी मावशीलादेखील अटक केलेली आहे.