सोशल मीडियावरील अनेक डेटिंग अॅप गुन्हेगारांचा नवा अड्डा बनली आहे. कालच नागपूरच्या एका जेष्ठ नागरिकाला गंडा घातल्याची चर्चा सुरु असताना सोशल मिडीयावर तरुणाला गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
सोशल मिदियावरील अॅपचा वापर करत पुण्यातील एका 27 वर्षीय तरुणीने तब्बल 16 युवकांना आपल्या जाळ्यात ओढून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा निरागस वाटणारा चेहीरा नीट लक्षात ठेवा, कारण याच चेहेऱ्याच्या पाठीमागे आहे एक अतिशय धूर्त व चलाख गुन्हेगार.
या तरुणीने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना डेटिंग अॅपद्वारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने व किंमती वस्तू लंपास केल्या आहेत.
अशाच एका लुटल्या गेलेल्या एका तरुणाच्या लक्षात ही बाब आली आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
-
डेटिंग अॅपचा फायदा घेत सायलीने ज्या 16 तरुणांना लुटलं त्यापैकी केवळ चारच जणांनी तिच्या विरोधात तक्रार दिली आहे. इतर तरुण आपली बेअब्रू होईल या भीतीने अजून ही तक्रार द्यायला धजावत नाहीत आणि नेमकी हीच अवस्था अशा गुन्ह्यात फसलेल्या अनेकांची होते. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे हे या निमित्ताने कळू शकेल.
या तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दखल घेत तपासचक्र फिरवली होती. मात्र, ही तरुणी अत्यंत चालाख होती. सोशल मिडीयाचा वापर ती अगदी हवा तसा, हवा तेव्हा सोयीने करत होती.
ज्या डेटिंग APP वरून ती तरुणांशी मैत्री करण्यासाठी ती स्वतःच अकाउंट उघडायची ते अकाउंट नंतर ती डिलीट करायची.
त्यामुळे तिच्या पर्यंत पोहोचायला पोलिसांना अडचण येत होती. मात्र, या तपासाला आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या पोलिसांनीही स्मार्ट गेम खेळला आणि ही तरुणी अलगद त्यांच्या जाळ्यात अडकली.
पुण्यातील साधुवासवणी रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी आरोपी सायली काळेला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा तेही चक्रावले, कारण तिने ज्या सोळा तरुणांना लुटलं होतं तो सगळा ऐवज तिच्याकडे सापडला.
ज्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या आणि महागड्या मोबाईलचा समावेश होता. सुमारे 15 लाखाहून अधिक किंमतीचा हा सगळा ऐवज पोलिसांनी आता जप्त केला आहे.