महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती | उदगीरकरांसाठी लवकरच ‘गुड न्यूज’

432
उदगीर जिल्हा होणार?

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे किती आहेत असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर आपण त्याचे उत्तर देऊ 36 जिल्हे. मात्र आता या उत्तरामध्ये काही दिवसांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

कारण राज्यांमध्ये 22 नवीन जिल्हे वय 49 नवीन तालुके निर्मितीचा प्रस्ताव विचारात आहे तर मित्रांनो आपण या लेखात जाणून घेणार आहोत कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून होणार आहे. याबाबत महत्वपूर्ण वेगवान हालचाली सुरू असल्याची खात्रीपूर्वक वृत्त आहे.

राज्यात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालूके निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.उदगीर जिल्हा होणार?

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून नव्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता.

वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे नाशिक जिल्ह्यातून मालेगाव कळवण जिल्ह्याचा निर्मितीचा प्रस्ताव आहे तर मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर ला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे उदगीर जिल्हा निर्मिती ची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हे आहेत.

उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट तालुक्यात यात समाविष्ट होतील तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल आणि नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीर मध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि मुखेड देखील उदगीरला जोडता येऊ शकते. उदगीर जिल्हा करताना साधारणता साठ किलोमीटर अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकते.

चला तर जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यांमधून कोणते नवीन जिल्ह्यांचा समावेश होण्याचा प्रस्ताव आहे!

नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण, ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यातून चिमूर.

गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी, जळगाव जिल्ह्यातून भुसावळ, लातूर जिल्ह्यातून उदगीर, बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई, नांदेड जिल्ह्यातून कीनवट, सातारा जिल्ह्यातून मानदेश, पुणे जिल्ह्यातून शिवनेरी, पालघर जिल्ह्यातून जव्हार.

रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड, रायगड जिल्ह्यातील महाड, अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर अशा या जिल्ह्यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मित्रांनो लवकरच हे जिल्हे अस्तित्वात येतील अशी आपण आशा करूयात.

पण आपल्याला वाटते का की या नवीन जिल्ह्यांची खरच गरज आहे अथवा नाही. कोणता नवीन जिल्हा व्हावी अशी आपली इच्छा आहे याबद्दल आपले मत कमेंट मध्ये नक्की सांगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here