लातूर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतुक करण्याकरीता तसेच दळणवळणाची साधने सोयीचे व्हावे यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पालकमंत्री शेत पाणंद रस्ता योजनेतून लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट या तालुक्यांना 5 कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
पालकमंत्री पानंद रस्ते योजना अंतर्गत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्या करिता 4 कोटी तर जळकोट तालुका करिता 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांना शेतापर्यंत शेतीमालाची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे.
या पालकमंत्री पानंद शेतरस्ता योजनेमुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील जवळपास 50 ते 60 गावांना याचा फायदा होणार आहे असे राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.