उदगीर : शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी सोडवण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या भागात सिग्नल व्यवस्था करण्यासाठी राज्य शासनाने 50 लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील महत्वाच्या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल असावे अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होती.
या मागणीला राज्य शासनाने सिग्नलसाठी 50 लक्ष रुपयांची प्रशासन मान्यता दिली आहे.
यातून उदगीर शहरातील शिवाजी चौक, कृष्णकांत चौक, उमा चौक, पोलीस स्टेशन चौक येथे स्वयंचलित सिग्नल बसविण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत हे काम करण्यात येणार आहेत.
यामुळे उदगीर शहरातील वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.