5G सुपरफास्ट नेटवर्कमुळे जीवसृष्टी संकटांत? 5G तंत्रज्ञानमुळे काय बदल घडतील? जाणून घ्या 5G फायदे आणि तोटे!

391

नवी दिल्ली : देशात 5G लाँच करण्यासाठी दूरसंचार विभागाने परवानगी दिल्यानंतर 5G ला विरोध करणारे आणि त्याचे समर्थन करणारे एकमेका समोर येऊन उभे राहिले आहेत.

काही जणांचा दावा आहे की 5G मुळे देशात कोरोनाचा प्रसार होत आहे आणि जगभरातील कोरोनाच्या हाहाकारामागे 5G चा टेस्टिंग असल्याचे सांगितले जात आहे. 5G मुळे अनेक रोग मानव जातीला संपवून टाकतील. अनेक कीटक, पक्षी 5G रेडिएशनमुळे नष्ट होतील असा दावा केला जात आहे.

या सर्व गोंधळात दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे.

ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे. या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स) ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि तंत्रज्ञान प्रदात्यांसह (टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स) म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT बरोबर भागीदारी केली आहे.

त्याच वेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार आहे.

दरम्यान, 5G Technology मुळे पक्षी, जीवजंतूंसह मानवी जीवनमान धोक्यात असल्याचा दावा आतापर्यंत अनेकांनी केला आहे. त्यासंबंधीच्या बातम्या सतत्याने प्रसिद्ध होत आहेत. आजपासूनच सोशल मीडियावर ‘उद्या दि.१३ रोजी मोबाईल वापरू नका, धोका आहे’ असे मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहेत.

त्यामुळे अनेकांनी 5 जी टेस्टिंग किंवा 5 जी ट्रायल्सना विरोध केला आहे. काहीनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. या सर्व दाव्यांमध्ये सत्यता किती आहे, हे जाणून घेण्याआधी 5G तंत्रज्ञान समजणे महत्त्वाचे आहे. 5G म्हणजे तंत्रज्ञानाच्या पाचव्या जनरेशनची उपलब्धी आहे.

सध्या आपण सध्या 4G तंत्रज्ञान वापरत आहोत. अर्थात नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजी आतापेक्षा वेगवान आणि चांगली आहे. एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास 5G च्या आगमनाने आपल्याला हायस्पीड इंटरनेट मिळेल.

सध्या सतत नेटवर्कची जी समस्या येते त्यावर मात करणारे तंत्रज्ञान असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले असले तरी सामान्य माणसाला 5G च्या नावाने भीती वाटू लागली आहे.

5G टेक्नॉलॉजीमुळे व्हिडिओ पाहू शकतो, काहीही क्षणात डाउनलोड करू शकतो, फास्ट वेबसाइट पाहू शकतो आणि इंटरनेटशी संबंधित इतर गोष्टी मोठ्या वेगाने करू शकतो.

5G बाबतच्या धोक्यांविषयी भीती!

याक्षणी 5G रेडिएशनबद्दल बरेच काही सांगितले जात आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होईल, भारत आणि इतर देशांमध्ये सध्याच्या परिस्थितीसाठी (कोरोना संबंधित) 5G लाही जबाबदार धरले जात आहे.

काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, 5G सपोर्टे़ड सेलफोन कर्करोगासारखे आजार पसरवू शकतात. काही रिसर्च पेपरमध्ये असेही म्हटले आहे की 5G टॉवर्समधून बाहेर पडणारी हाय फ्रीक्वेन्सी रेडिएशनमुळे कर्करोग, वंध्यत्व, DNA आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पण मुळात 5 जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. जगभरात असे अनेक देश आहेत, ज्या देशांमध्ये अद्याप 5 जी टेस्टिंग सुरु झालेले नाही, परंतु तिथे मोठ्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.

तर दुसऱ्या बाजूला जो रेडिएशनबाबत दावा केला जात आहे, तर ती बाब तुमच्या वापरावर अवलंबून असते. त्याच वेळी, हे दावे खरे ठरवतील असे कोणतेही पुरावे कोणीही सादर करु शकलेले नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे दावे नाकारण्याशिवाय पर्याय नाही.

भारतात Jio चे स्वतःचे नेटवर्क

रिलायन्स जिओने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, ते एक स्वदेशी 5 जी नेटवर्क विकसित करणारर आहेत. जिओचे 5 जी नेटवर्क भारतातच विकसित केले जाईल आणि त्याचे पूर्ण लक्ष मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारतावर असेल.

त्याच वेळी, एअरटेलने हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे नेटवर्क 5G तयार आहे आणि आता ते केवळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

ट्रायल्ससाठी 6 महिने

सध्या या ट्रायल्सचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी व स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परवानगीमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, प्रत्येक टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्ज व्यतिरिक्त ग्रामीण आणि निम-शहरी सेटिंग्जमध्ये ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेणेकरून देशभरातील 5 जी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणि हे नेटवर्क केवळ शहरी भागातच मर्यादित न राहता निम-शहरी आणि ग्रामीण भागातही पोहोचेल.

वेगवेगळ्या बँडमध्ये टेस्टिंग

टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँडमध्ये ऑफर केली जाते, ज्यामध्ये मिड-बँड (3.2 गीगाहर्ट्ज ते 3.67 गीगाहर्ट्ज), मिलीमीटर वेव्ह बँड (24.25 गीगाहर्ट्ज ते 28.5 गीगाहर्ट्ज) आणि सब-गीगाहर्ट्ज बँड (700 गीगाहर्ट्झ) आहेत. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या 5 जी ट्रायल्स घेण्यासाठी सध्याचे स्पेक्ट्रम (800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2500 मेगाहर्ट्ज) वापरण्याची परवानगी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here