आग्रा: उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या ७५ वर्षीय आईवर बलात्कार केला.
मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या आरोपीने आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर अत्याचार केला. सूनेनेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली.
आग्रा येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा लज्जास्पद प्रकार घडला. ४५ वर्षीय अमर सिंह हा पत्नी, मुलगा आणि सूनेसोबत राहत आहे.
अमर सिंह रोज दारू पिऊन घरी येत असे. बुधवारी रात्री अमर सिंह याचा मुलगा घरात नव्हता. त्याचवेळी अमर सिंह हा दारू पिऊन घरी आला.
तो खोलीत गेला आणि आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरड केल्यानंतर अमर सिंहची पत्नी आणि सून धावून गेली. सूनेने तात्काळ पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी अमर सिंह याला ताब्यात घेतले. आरोपीची पत्नी आणि सून या दोघी पीडितेला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्या.
त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.