स्वराज्याला 75 वर्ष झाली, सुराज्य आलं का? : मुख्यमंत्री ठाकरे

184
Udhav-Thakre CM Maharashtra

मुंबई : आज ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आले. 

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाचा नुसता उत्सव नाही. तर हा जात, पात, धर्म या पलीकडे जाऊन देशा प्रति आपल्या सगळ्यांच्या भावनांचा सन्मान आहे.

75 वर्ष पूर्ण करतो आहोत. कुर्बानीची पण आठवण ठेवत आहोत. जे शहीद झाले त्यांची आठवण काढतो पण तितकेच मर्यादित नाही.

त्यांनी बलिदान केले आहे. त्यांना अभिमान वाटेल अस जगणं असा देश उभा करू शकलो का हा प्रश्न आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी नेतृत्व केले ,देशाला सर्वसमावेशक चळवळ सुरू केली. मुख्यमंत्र्यांना विनंती करीन स्वातंत्र्याचे हे केंद्र आहे. इथून सगळ्यांना प्रेरणा मिळेल, असं एक स्थान निर्माण करावं अशी इच्छा व्यक्त करतो, असं ते म्हणाले.  

ते म्हणाले, स्वराज्य आधी की सुराज्य आधी हा मुद्दा होता. आता स्वराज्याला 75 वर्ष झाली. सुराज्य आले का? याचा विचार कोण करणार. आज हे मैदान निशब्द आहे.

कुर्बानी देऊन हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या पिढीला आयते मिळालेय. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याचे तेज जपले पाहिजे. हे मैदान बोललं पाहिजे, तो इतिहास जिवंत करणार स्मारक इथे झालं पाहिजे, असे ते म्हणाले.

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी वर्षभर चालणाऱ्या चांगल्या उपक्रमाची सुरवात झाली आहे.

मंत्री अस्लम शेख म्हणाले की, आज या मंचावरील लोकांची विचारधारा वेगळी असली तरी सगळ्यांचे लक्ष्य देशाला चांगले कसे बनवणे हेच असेल. राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत आहे, असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here