80 वर्षाची आजी नातवाच्या वयाच्या मुलासोबत ‘विवाहबद्ध’ | तरुणाचं वय 35 वर्ष

281

प्रेम आंधळं असतं, प्रेमात वय, जात, पात, धर्म, श्रीमंत-गरीबी, रुप-रंग याचं भेद नसतं. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं आणि त्याला मर्यादा नसते.

याचं जिवंत उदाहरण बघायला मिळत आहे जेव्हा एका 80 वर्षाच्या आजीनं वयाच्या सर्व मर्यादा तोडत आपल्यापेक्षा 45 वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत लग्न केलं.

लग्नानंतर हे दोघं आता सोबत राहत आहेत.ब्रिटनमध्ये राहणारी 80 वर्षाची आजी आयरिस जोन्स यांनी आपल्यापेक्षा वयाने 45 वर्षांनी लहान असणाऱ्या अर्थात 35 वर्षीय मोहम्मद इब्राहिमशी लग्न केलं.

दोघांची मैत्री फेसबुकच्या माध्यमातून झाली आणि दोघे तासनतास एकमेकांशी गप्पा मारत असायचे. काही दिवसानंतर इब्राहिमनं आयरीससमोर प्रेम असल्याचे जाहिर केले आणि आयरीस त्याला भेटण्यासाठी थेट इजिप्तला जाऊन पोहचली.

याचे फोटो तिनं सोशल मीडियावरही टाकले. त्यानंतर हे फोटो प्रचंड व्हायरल होतं आहेत. मीडिया सूत्रांप्रमाणे आता हे जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे.

या कपलने 2020 ची सुरुवातीस मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगासमोर मांडलं होतं. एका ‍टिव्ही शो मध्ये दोघांनी फर्स्ट नाइट एक्सपीरियंस देखील शेअर केलं होतं ज्यामुळे हे कपल व्हायरल झालं होतं.

आयरीस सध्या तिच्या पतीसोबत इजिप्तमध्ये राहत आहे. दोघांनी सर्वांचा नकार झेलत आमचं आपसात खरं प्रेम असल्याचं म्हटलं आहे. दोघं एकमेकांसोबत आनंदी असल्याचं सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here