कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर तर्फे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी अत्यंत महत्वाची शेतकऱ्यांना उपयुक्त योजना राबविण्यात येणार आहे.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जनावरे नैसर्गिक आपत्तीने दगावली असतील तर त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 21 हजार रुपये तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कडबा जळाला असेल अशा शेतकऱ्यांना रुपये 25 हजार इतके अनुदान कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने देण्यात येणार आहे.
राज्यात कल्याणकारी योजना राबविणारी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. सदर योजना मंजूर करण्यासाठी उदगीरचे आमदार तथा नामदार संजयजी बनसोडे यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करत ही योजना मंजूर करून घेतली आहे.
लोकनेते चंद्रशेखर भोसले साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जी स्वप्ने पाहिली होती, ती स्वप्ने आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील पूर्ण करत आहेत.
यापूर्वी सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांच्या आरोग्य व उपचारासाठी शिवराज पाटील चाकूरकर आरोग्य विमा योजना तसेच शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्मली तर वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजना, हमाल आणि ड्रायव्हर यांचा विमा योजना राबविण्यात आली होती.
आगामी काळातही अशाच शेतकरी उपयोगी शेतकरी हिताच्या योजना बाजार समिती राबवेल यामध्ये कुठलीही दुमत नाही. या योजनेचा शुभारंभ काल नळगीर आणि मादलापुर येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देऊन राज्यमंत्री माननीय नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील साहेब, पंचायत समिती सभापती प्रा.शिवाजी मुळे, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, पद्माकर उगिले, अनिल लांजे,कुमार पाटील, संजय पवार, गजानन बिरादार, धनाजी जाधव, गौतम पिंपरे, श्याम डावळे, धनाजी मुळे, सतीश पाटील मानकीकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.