चार मुलांची आई आणि 22 वर्षीय प्रियकर | लग्न करण्यासाठी प्रियकराच्या घरापुढे तिने ‘हे’ केले !

1122
Marriage racket

प्रेयसी आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन प्रियकराच्या (Lover) घरापुढे मागील 72 तासांपासून बसली आहे. लग्नासाठी (Marriage) ती आपल्या प्रियकराची वाट पाहात आहे.

लखनऊ : प्रेमात पडणे, त्यात फसवणूक होणे, त्यावर झालेले वादविवाद आपल्या समोर (Cheating in Love) येत असतात. मात्र, काही घटना एवढ्या विचित्र असतात की आपली सामाजिक बंधन आणि कल्पना गळून पडतात.

सदरील घटेनमध्ये एक प्रेयसी आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन प्रियकराच्या (Lover) घरापुढे मागील 72 ताासांपासून बसून आहे. लग्नासाठी (Marriage) ती आपल्या प्रियकराची वाट पाहात आहे.

मात्र, ऐनवेळी प्रियकर आणि त्याचे कुटुंबीय घराच्या दरवाजाला कुलूप लावून फरार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील महराजगंज येथील आहे. शुक्रवारी बदलापूरच्या सीओंनी तिला समजावण्याची खूप प्रयत्न केला मात्र ती आपल्या मागणीवर ठाम आहे.

सविस्तर वृत्त असे की, मौलाना मोलबी समसुल वारिश यांच्या 22 वर्षीय कमरुल वारिश या मुलाचे आपल्याच परिसरातील 37 वर्षीय चार मुलांच्या आईसोबत संबंध होते.

तो प्रेयसीच्या घरी जात तिच्या मुलांना शिकवत असे. कामानिमित्त तो मुंबईमध्ये राहात होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात घरी परत येऊन मजुरी करत होता.

एका महिन्यापूर्वी महिला कोलकातामध्ये आपल्या माहेरी गेली होती. प्रियकराच्या म्हणण्यानुसार ती 28 एप्रिलला वाराणसीमध्ये आली. त्याच्या बहिणीच्या घरी हे दोघेही तीन दिवस राहिले.

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही एकमेकांना लपून भेटत होते. यानंतर हे जोडपे महराजगंज मध्ये पोहोचले आणि आपल्या वडिलांच्या जुन्या घरामध्ये ते राहिले.

महिलेच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या वडिलांनी तिला सांगितले की ‘तू तुझ्या नवऱ्याकडून तलाक घेऊन ये. यानंतर तुझा निकाह माझ्या मुलासोबत करुन देईन’ व त्यानंतर तिचा प्रियकरही हेच सांगून गेला की तलाक घेऊन ये मग आपण लग्न करू.

तिने सांगितले की त्याचा भाऊ आणि वडिलांना त्याला धमकी देऊन पळवून लावले आहे. मात्र, त्याने मला सांगितले आहे की ‘मी माघारी येत नाही, तोपर्यंत माझ्या घरीच थांब’.

महिलेनं सांगितले की, तो जोपर्यंत माघारी येत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहाणार आहे. त्याच्यासोबत मी मागील तीन वर्षांपासून नात्यात असून हा दीड वर्षाचा मुलगाही त्याचाच आहे. तिने सांगितले की मागच्या 72 तासांपासून मी काहीही न खाता त्याच्या घरच्या दारात बसले आहे.

महिलेनं सांगितलं, की जोपर्यंत तिचा प्रियकर माघारी येत नाही, तोपर्यंत ती काहीही खाणार नाही. शेजाऱ्यांनी तिच्या दीड वर्षाच्या मुलासाठी दुधाची व्यवस्था केली आहे.

याबाबतीत बोलताना एसओ ओम नारायण सिंह यांनी सांगितले, की या महिलेला खूप समजावले मात्र ती काहीही ऐकायला तयार नाही. तिच्या भोजनाची व्यवस्था करण्यास एका शेजारच्या व्यक्तीला सांगितले आहे. गरज पडल्यास तिच्या राहाण्याचीही तिथेच व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here