● महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही रेमडेसिवीर मिळावे, यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे.
● एप्रिल महिन्यात होणारी JEE परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुढील तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.
● यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरच्या जनतेलाच ही कोरोना साखळी ताेडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले.
● वाढते कोरोना रुग्ण आणि रेमडेसिवीरचा पुरवठा याचे प्रमाण रोजच्या रोज व्यस्त बनत चालले आहे. राज्यात रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहेत.
● रुग्ण आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे.
● तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
● केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे कोरोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.
● लातूर जिल्हयात मागील 24 तासात 1683 कोरोना बाधित रूग्ण आढळले; 925 जणांची कोरोनावर मात
● जिल्हयात विनाकारण फिरत असलेल्या नागरीकांची होणार कोरोना चाचणी
● पालावर वास्तव्य करणारे लोक, लेकरे यांना मिळतोय शिवभोजनाचा आधार
● जिल्हाभरात अत्यावश्यक सेवेचा कालावधी सकाळी 7 ते सकाळी 11 असा करण्यात आला आहे : पृथ्वीराज बी पी
● उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 653 कोरोना पॉझिटिव्ह तर रिकव्हरी रेट 79.12 टक्के
● जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या कामकाजास सुरूवात; हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार
● उस्मानाबाद शहरात विनाकारण बाहेर फिरणा-यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करा : नगरसेवक युवराज नळे
● उस्मानाबाद येथील सामान्य रुग्णांलयातल्या ऑक्सिजन प्रकल्पास परवाना व ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावा : खासदार ओमराजे
● कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा; रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट; इंजेक्शनची साठेबाजी व काळ्याबाजाराला आळा घालण्याचे राज्यांना निर्देश
● स्थिती पाहून निर्बंध कालावधी वाढवणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे; केंद्राकडे दोन हजार टन प्राणवायू पुरवठ्याची मागणी
● राज्यात दिवसभरात 67 हजार 123 कोरोनाबाधित वाढले; 419 रूग्णांचा मृत्यू; राज्यात आज रोजी एकूण 6 लाख 47 हजार 933 ॲक्टिव्ह रुग्ण
● कोरोनाचा कहर : पुण्यामध्ये एकाच घरात 15 दिवसात पाच जणांचा मृत्यू; पूजेच्या निमित्ताने कुटुंब आले होते एकत्र
● विदर्भात एकाच दिवसात 236 बळी; मेळघाटात कोरोनाबाधित महिलेवर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू
● लशीमुळे केवळ कोरोनाच्या तीव्रतेत घट; तज्ज्ञांचे मत; केंद्र सरकारने म्हटले आहे, की कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आहेत
● महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
● गैर भाजपाशासित राज्यांवर केंद्राचा अन्याय; सोनिया गांधींची घणाघाती टीका; काँग्रेस वर्किंग कमिटीत सोनिया गाधींचा भाजपावर निशाणा
● मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी; हैदराबादवर 13 धावांनी केली मात; हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक
● ‘टकाटक’ च्या यशानंतर आता टकाटक 2; ‘या’ चित्रपटाच्या घोषणेनंतर सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण