आजच्या अतिशय महत्वाचा बातम्यांचा वेगवान आढावा

465
Today Top News

सहकार मंत्री दिलीप देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त १० तालुक्यात एकाच वेळी वृक्षारोपन.

रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे आता 44 प्रवासी असतील तरच एसटी ‘लालपरी’ धावणार आहे, असे बसस्थानक प्रमुख यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकार राज्यांना 6 हजार 177 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणार; महाराष्ट्राला मिळणार 1500 मेट्रिक टन; केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची माहिती

● राज्यात दिवसभरात 68 हजार 631 कोरोनाबाधित वाढले; 45 हजार 654 रुग्ण कोरोनामुक्त; 501 रूग्णांचा मृत्यू

● महाराष्ट्रातल्या 50 टक्के कोरोना बाधितांमध्ये आढळला भारतीय प्रकारचा विषाणू; या विषाणूला B.1.617 म्हटले जात आहे.

● लातूर जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री पोकलेनचा विचित्र स्फोट; हवेत उडालेले स्पेयर पार्ट्स लागून दोन जण ठार

● अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपाची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी जवळपास पूर्ण; अहवाल मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्याची शक्यता.

● केंद्र सरकारने फडणवीसांना ‘रेमडेसिवीर’ची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका.

● हलगर्जीपणा भोवला! महाराष्ट्रातील प्रवाशांचे कोविड रिपोर्ट तपासलेच नाही; चार विमान कंपन्यांवर गुन्हा; केजरीवाल सरकार आक्रमक भूमिकेत.

● कोरोना संसर्गाचे प्रमाण 12 दिवसांत दुप्पट; भारतात 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्ण सापडले; रविवारी 1501 मृत्यूंची नोंद.

● सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या खेळीमुळे दिल्लीचा पंजाबवर 6 गडी राखून विजय.

● अभिनेता आशुतोष राणा नंतर पत्नी रेणुका शहाणे आणि मुलेही कोरोना पॉझिटिव्ह; संपूर्ण कुटुंब होम क्वारंटाईन

● जिल्ह्यात मागील २४ तासात १८१३ रूग्ण आढळले तर ९८० कोरोनामुक्त झाले.

● महापालिकेच्या पुरणमल लाहोटी सेंटरला ३५ नवीन ऑक्सिजन बेड.

● उदगीर येथे मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांची बैठक, पवित्र रमजान कोरोना नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

● जिल्हयात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अशा स्थितीत काही नागरिक बेजबाबदार पणे रस्त्यावर फिरत आहेत.

● उदगीर पोलीसांनी अश्या नागरीकांची कोरोना चाचणी करण्यास सुरूवात केली आहे.

● आज पोलीसांनी १४८ नागरीकांची कोरोना चाचणी केली त्यातील १० जण कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.

● शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर निघालेल्या नागरीकावर पोलीसांची कारवाई.

● नांदेडमध्ये मागील दोन दिवसांपासून अँटिजन टेस्ट बंद आहेत, अँटिजन तपासणीच्या किट संपल्याने तपासण्या बंद असल्याचे सांगण्यात आले.

● लॉकडाऊन पाळून रूग्णवाढ रोखा, अन्यथा व्यवस्था कोलमडण्याची भीती; पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन.

● महापालिकेने शहरातील भक्ती लॉन्स येथे 200 खाटांच्या जम्बो कोविड सेंटरचे काम आठ दिवसांपूर्वी हाती घेतले होते, सध्या इथे 190 ऑक्सिजन बेड आहेत.

● किनवट – तालुक्यातील रामजीनाईक तांडा येथे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 11 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला; या घटनेचा तपास लावणे पोलिसांना आव्हान बनले आहे.

● ”कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याचे आदेश घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा शोध घ्या, जिल्हाधिकारी

● उस्मानाबाद मध्ये जम्बो कोविड रुग्णालये उभा करण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी.

● उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची 477ने संख्या वाढली.

● जिल्ह्यातील 360 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 16 व्यक्तींचा मृत्यू झाला.

● रेमडीसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कोरोना वॉर रूम मधून इंजेक्शन दिले जाणार.

● सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अंगावर काढणे धोकादायक : डॉ. विजयकुमार फड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here