सोशल मीडियावर प्रेमात पडलेल्या युवतीवर वकीलाने घरी बोलावून अनेकदा केला बलात्कार

377
CRIME news

ग्वालियर : एका 26 वर्षीय युवतीला लग्नाचं आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपी युवक हा पेशाने वकील असून त्याने पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला.

मात्र जेव्हा पीडितेनं लग्नासाठी विचारणा केली असता त्याने तिच्याशी वाद घालून संबंध तोडले. त्यामुळे पीडित युवतीने आरोपी वकीलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील आहे. ग्वालियर जिल्ह्यातील मुरारजवळील गुलाबपुरी येथील रहिवासी असणाऱ्या 26 वर्षीय युवतीचं गेल्या पाच वर्षांपासून आरोपीने लैंगिक शोषण केले आहे.

त्या दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले होते. दरम्यानच्या काळात आरोपी युवकाने पीडितेला घरी बोलावून अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जेव्हा पीडितेनं लग्नासाठी हट्ट धरला तेव्हा दोघांच्या संबंधात अंतर आले आणि त्यांची मैत्री तुटली.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेमात धोका मिळाल्यानंतर पीडित तरुणीने हजीरा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी तरुणाला अटक करून तुरुंगात धाडलं आहे. आरोपी तरुण हा वकिल असून त्याने पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. संबंधासाठी नकार दिला असता आरोपी तरुणाने तिला बदनाम करण्याची धमकीही अनेकदा दिली.

याबाबत पीडितेने पोलिसांना सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून ती आरोपी तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याने लग्नाचे वचन देऊन अनेकदा शारिरीक संबंध ठेवले.

जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरू केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here