मुंबई : आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा फिटनेस कोच नुपूर शिखरे बर्याच दिवसांपासून रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. दोघं लॉकडाउनपासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होते.
व्हॅलेन्टाइनच्या खास आठवड्यात इराने नुपूरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे रोमॅण्टिक फोटो पाहून इराने जवळजवळ तिचं नातं अधिकृत केलं आहे.
‘आय लव्ह यू’ म्हणून नुपूरनेही दिली अनोखी प्रतिक्रिया
इराने प्रॉमिस डेच्या दिवशी नुपूरसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यात ‘माय व्हॅलेन्टाइन’ चा हॅशटॅगही दिला आहे. इराने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या पोस्टला उत्तर म्हणून नुपूरने इराला ‘आय लव्ह यू’ लिहिले आहे.
इरा खानने नुकताच तिच्या चुलत भावाच्या जैनच्या लग्नाला हजेरी लावली होती. या सोहळ्यात तिच्यासोबत नुपूरही होता. इराने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. लॉकडाउनदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली.
याच काळात त्यांनी नात्यात येण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे इराने नुपूरच्या हातावर टॅटूही गोंदवला. एवढंच नाही तर इराने तिची आई रीना दत्तशी नुपूरची ओळख करुन दिली होती. त्याचबरोबर इराचेही नुपूरच्या कुटूंबाशी चांगले संबंध आहेत. नुपूर आमिर खानचा फिटनेस कोच आहे.