About Us

Rajnetanews.com ही मराठीतील वेबसाइट आहे. वृत्तपत्र माध्यमात वाढलेली स्पर्धा, राजकीय हस्तक्षेप किंवा वाढता दबाव वृत्तपत्रांना संपवत आहे. 

वृत्तपत्र क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे वाढत चाललेलं पेड न्यूज, फेक न्यूज तसंच इतर गैरप्रकारांपासून पत्रकारितेला दूर ठेवण्यासाठी कमी गुंतवणूक व वेगवान बातमी देण्यासाठी न्युज पोर्टल एक प्रभावी माध्यम आहे.

सध्या वेब पोर्टल वाढत असले तरी यामध्येही दर्जा आणि गुणवत्ताचं महत्वाची राहणार आहे. दैनिक व साप्ताहिक राजेनताच्या माध्यमातून मागील 20 वर्षांचा पत्रकारीतेतील अनुभव पोर्टलची गुणवत्ता आणि दर्जा टिकविण्यासाठी महत्वाचे राहणार आहे.

मागील 20 वर्षात साप्ताहिक व दैनिक प्रकाशित केले आहे. त्यामुळे वृत्तपत्र मुद्रण, वितरण, जाहीरातीचे अर्थकारण याचा जवळून अनुभव घेतला आहे.

Rajnetanews.com च्या माध्यमातून आजपर्यंत अनेक महत्वाच्या विषयांना वाचा फोडली आहे. सामाजिक, शैक्षणिक, औद्योगीक, सांस्कृतिक, कृषी, राजकारण, उद्योग, व्यापार, महिला सबलीकरण, पंचायत राज, ग्रामविकास यासारख्या अनेक विषयांवर बारकाईने लिखाण केले आहे.

यासोबतच सरकारी योजनांची अंमलबजावणी, दप्तर दिरंगाईमुळे रखडलेली सामान्याच्या समस्या, अनेक रखडलेले प्रकल्प, पिडीत व शोषित महिलांचे विविध प्रश्न, अनुसुचित जाती-जमातींवर होणारे अन्याय, बेरोजगारी, जाती-पातींवर आधारित राजकारण, भ्रष्टाचार, इतिहासाची मोडतोड, आर्थिक साक्षरता, शिक्षण, संविधानाबद्दल जागरूकता यासारख्या  जिव्हाळ्याच्या विषयांवरही काम करीत आहोत.

पत्रकारितेत जवळपास 20 वर्षे कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचेही Rajnetanews.com मार्गदर्शन व लिखाणाने समृध्द होत आहे. गेस्ट पोस्ट, ब्लॉग, लेख, कविता, साहित्य यालाही तेवढीच प्रसिद्धी दिली आहे. Rajnetanews.com नवीन असले तरी सामान्य वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेले न्यूज पोर्टल आहे.

Rajnetanews.com केवळ एक न्युज पोर्टल नसून मागील 20 वर्षात घेतलेल्या परिश्रमाचे व सामाजिक बांंधिलकीचे बंधन आहे. Rajnetanews.com वृतपत्र क्षेत्राच्या बदलत्या कालानुरूप स्वतःला बदलून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला अपडेट करीत आहे. सोबतच माध्यमाची ताकत व जबाबदारीची जाणीव कायम बाळगून आहे.

यापुढील काळातही स्वतःला काळाबरोबर अपडेट ठेवण्याच्या प्रयत्न करत राहू, यासाठी आपल्या सहकार्य आणि मार्गर्शन राहू द्या. आपला सल्ला व मार्गदर्शनाने Rajnetanews.com समृध्द होणार आहे. आपले सहकार्य व पाठबळ असु द्यावे. आपल्या सूचना व प्रतिक्रिया कळवा, त्यानुसार नक्की बदल करू ! धन्यवाद !

Facebook : rajnetanews
Instagram : rajnetanews
Twitter : rajnetanews
Flickr : rajnetanews
Linkdin : rajnetanews
Tumblr : rajnetanews
Reddit : rajnetanews
Pinterest : rajnetanews

विनोद मिंचे / Vinod Minche
Editor : Rajnetanews.com

Note: The opinions published on the site are the personal opinions of the author. They will be responsible for it. Its references and opinions The site does not say your opinions. Full reference to the article will be the responsibility of the author. rajnetanews.com does not agree with any opinion.