अबू आझमी समर्थकांनी बर्थ डे रॅली काढली अन् तलवार बाळगली | आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल

326

मुंबई : कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे जिकडे तिकडे कोरोनाचे नियम पायदळी तुटवले जात आहे. यात आता नेतेही सामील झाले आहेत.

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Samajwadi Party MLA Abu Aazmi) यांनीही वाढदिवसानिमित्त विना परवानगी रॅली काढली आणि कोरोना नियमाचा भंग केला होता.

त्यामुळे अबू आझमींसह 17 जणांवर गोवंडीच्या (Govandi) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.८ रोजी संध्याकाळी 5.15 वाजेच्या सुमारास विना परवानगी रॅली काढली होती.

या रॅलीत कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. या रॅलीत लोकांनी एकच गर्दी केली होती.

या मिरवणुकीत कुणीही मास्क वापरले नव्हते. अबू आझमी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी २५ ते ३० कार्यकर्त्यांचा जमाव करून कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला.

अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार सुद्धा बाळगले होते.

त्यामुळे पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे हत्यार बंदी आदेशाचा भंग केला होता.

त्यामुळे अबू आझमी यांच्यासह 17 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकार पक्षातर्फे फिर्याद दाखल करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.क्रमांक -७७६/२१ कलम १८८,२६९, भा.द.वी.सह कलम ११ महाराष्ट्र कोव्हिड उपाय़ोजना २०२० सह कलम ४,२५भाहका. सह३७(अ)(१),१३५ मपोका.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here