पुण्याहून उदगीरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात | रस्त्याचे काम संथगतीने, राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

303

उदगीर लातूर प्रवास दुचाकी असो कि चारचाकी अपघात प्रवण ठरू लागला आहे. मागील वर्ष भरापासून संथ गतीने सुरु असलेले काम रोज नवनवीन अपघाताला निमंत्रण देत आहे. 

उदगीर लातूर रस्ता तर सतत सोशल मिडीयावर मुतखडा कमी करण्याचा उपाय, पाठीचा मणका दुखत होता आणि प्रवास करताच दुरुस्त झाला अशा मिम्स फिरत असतात.

आज असाच एक अपघात झाला आहे, नवीन रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्ता अपघात प्रवण झाला आहे. सुदैवाने अपघात झाला पण जीवित हानी झाली नाही.

पुणे येथून उदगीर कडे प्रवासी घेऊन निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स MH-24 AU-7070 ही डिग्रस पासून अर्धा किलोमीटर वर रस्त्याच्या खाली उतरली व पलटी झाली.

या अपघातात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. रस्त्यांच्या कामामुळे एक बाजू वाहतुकीसाठी मोकळी करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या कामामुळे खूप मोठ्या प्रमाणात खडक टाकला जात असल्यामुळे व त्याची व्यवस्थित दबाई करण्यात आलेली नाही.

तसेच त्यावर पाणी न टाकल्यामुळे उडालेल्या धुराळ्यामुळे चालकाला पुढचे काहीच न दिसल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली उतरली आणि नाल्यात पलटी झाली असे सांगितले जाते आहे.

ट्रॅव्हल्समध्ये 40 ते 42 प्रवासी प्रवास करत होते या अपघातांमध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

एका महिलेला गंभीर मार लागला असून त्यांचे नाव अद्याप समजले नाही. जखमींना उपचारासाठी उदगीर येथे पाठविण्यात आले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

या अपघातांमध्ये ट्रॅव्हल्सचे पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातस्थळी संतप्त लोकांनी राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने काम संथ सुरु असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here