सध्या राज्यात काही लोक ज्या पद्दतीनं अफाट, बेफाम, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत अनेक आरोप केले जात आहेत. हे सारे आरोप निराधार आणि सूड बुद्धीने केले जात आहेत.
त्यानंतर काल राज्यातील प्रमुख नेत्यांबाबत, तसेच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवरही आरोप केले. यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे, ते सर्व न्यायालयात जाईल.
जर आज माझ्यावर केले जाणारे आरोप तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत, तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
आम्ही गेली अनेक वर्ष राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केली आहेत.
तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल एखाद्या पक्षानं वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता आम्ही केली नाही.
ठिक आहे, पाहू आम्ही, तुम्हीसुद्धा आहात आणि आम्हीसुद्धा आहोत; असं संजय राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
राज्यातील नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं, असं मला वाटत नाही. कारण आमच्याही सिक्युरिटी यापूर्वी काढलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही कधी बोंबललो नाही.
मागील सरकारच्या काळात आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दानं तक्रार केली नाही.
सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे.
विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं असा ट्रेन्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे, अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.