नागपूरच्या जरीपटका भागातील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई ! नेमके काय घडले होते, पहा व्हिडीओ !

552

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

मात्र लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहासाठी भाजी विक्री करणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडीओ बघताबघता चांगलाच व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर या पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी करण्यात येत होती.

या घटनेची दखल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही घ्यावी लागली. अखेर पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे दोन वर्षाचे इन्क्रिमेंट न देण्याचा आदेश काढण्यात आला असून सोशल मीडियाने पुन्हा एकदा आपली ताकत सिद्ध केली आहे.

नागपूरच्या जरीपटका भागातील कुशी नगर परिसरात एक महिला भाजी विक्री करत होती. खाकी वर्दीतील अधिकाराचा गैरवापर करत पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी त्या महिलेची सगळी भाजी आणि बाकी सामान रस्त्यावर फेकून दिले होते.

तिथल्या रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्याची ही कृती मोबाईलमध्ये कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्या मुजोरीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

समाज माध्यमातून वाढत्या दबावापोटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर अखेर नागपूर पोलिसांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई केली आहे.

नागपूर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांच्या आदेशानुसार संतोष खांडेकर यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष खांडेकर यांचे दोन वर्षाचे इन्क्रिमेंट रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here