पुण्यातील काही दिवसांपूर्वी आयोजित एल्गार परिषदेत बोलताना अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केले होते होते.
हे आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने ‘हिंदू समाज सडला आहे’, असे आक्षेपार्ह वक्तव्य एल्गार परिषदेत केले होते.
यावरून हिंदू समाजातून तीव्र प्रक्रिया उमटत आहेत. याच संदर्भात विचारले असता त्याच्या भाषणाचा व्हिडीओ बोलावला आहे. त्याची रितसर तपासणी करू. त्यानंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच होईल, असेही देशमुख यावेळी म्हणाले.
कोण आहे हा उस्मानी?
शरजील उस्मानी हा वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो. दिल्लीत ‘सीएए’विरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याला अटक झाली होती.
त्याने त्यावेळी टिव्टरवर एक फोटो शेअर केला होता आणि त्यात पुन्हा बाबरी उभारू असे लिहिले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली होती. नंतर तो जामिनावर सुटला.