मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सेटवरील आपल्या किस्स्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो.
तो सेटवर अशी काही कृत्य करतो की जामुळे त्याच्या सहकलाकारांना तो चित्रपट लक्षात राहो ना राहो पण ती घटना मात्र ते आजन्म विसरत नाहीत. करिअरच्या सुरुवातीस आमिरला अशीच एक विचित्र सवय होती.
तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा. त्याच्या मते त्याने असे कृत्य ज्या कुठल्या अभिनेत्रींसोबत केले त्या अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार झाल्या आहेत.
-
अनेक अभिनेत्रींनी आमिरच्या या खोड्यांकडे दूर्लक्ष केलं मात्र अभिनेत्री जूही चावला आमिरच्या या कृत्याने चांगलीच नाराज झाली होती. 1997 सालात आलेल्या ‘इश्क’ सिनेमाच्या सेटवर सर्वांच्या समोर आमिरने भविष्य वाचण्यासाठी जूहीला हात पुढे करण्यासाठी सांगितले.
-
तिने हात पुढे करताच आमिर तिच्या हातावर थुंकला आणि त्याने पळ काढला. आमिरचा राग आल्याने जुहीने दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या शूटिंगला येण्यास नकार दिला. यावर आमिरलादेखील जूहिचा राग आला. या घटनेनंतर दोघेही काही वर्ष एकमेकांशी बोलले नाही. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा बोलू लागले.
काही वर्षांपुर्वी ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटाच्या निमित्तानं एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमिरने हा थक्क करणारा किस्सा सांगितला होता.
फराह खाननं हा किस्सा सांगायला सुरुवात केली. आमिर भविष्य वाचण्याच्या निमित्तानं अभिनेत्रींचा हात हातात घेतो आणि त्यावर थुंकून पळून जातो. यावर आमिरनं हा आरोप मान्य केला. तो म्हणाला, हे मी आजही करतो.
दंगल चित्रपटाच्या वेळी मी अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या हातावर थुंकलो होतो. पाहा आज ते सुपरस्टार आहेत. मी ज्या कुठल्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो त्या सुपरस्टार होतात असा दावा आमिरने केला. हा व्हिडीओ सध्या जोरजार व्हायरल होत आहे.