मुंबई : 2020 साली कोरोनाची महासाथ आली. संपूर्ण वर्षभर या आजारानं थैमान घेतलं. 2021 मध्ये कोरोनाविरोधातील लस आली आणि आता कुठे लोकांना दिलासा मिळाला.
आता कोरोनापेक्षाही भयंकर अशा दोन संकटांचा भविष्यात सामना करावा लागणार आहे. असा इशारा मायक्रोसॉफ्कटचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.
बिल गेट्स यांनी 2015 साली कोरोना महासाथीबाबतदेखील भविष्यवाणी केली होती. जी आता खरी ठरते आहे. आता कोरोनातून जग कुठे सावरत असताना त्यांनी जगाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. ‘व्हेरीटाझियम’ (Veritasium) युट्यूब चॅनेलवर त्यांनी धक्कादायक अशी माहिती दिली आहे.
‘व्हेरीटाझियम’ युट्यूब चॅनेल डेरेक म्युलर यांना मुलाखत देताना बिल हेट्स म्हणाले, असे भरपूर रेस्पिरेटरी व्हायरस आहे आणि ते येतच राहणार. रेस्पिरेटरी डिसीज म्हणजेच श्वसनसंबंधी आजार खूप धोकादायक आहेत. त्यांच्यापासून सावध राहायलाच हवे.
शिवाय जगासमोर आणखी दोन संकटं आहेत एक म्हणजे वातावरण बदल (climate change) आणि दुसरं बायो टेरोरिझम (Bio-terrorism)
वातावरण बदलामुळे दरवर्षी महासाथीपेक्षाही जास्त बळी जातात आणि दुसरं म्हणजे बायो टेरोरिझम Bio-terrorism. म्हणजे व्हायरस हल्ला आणि यामुळे पोहोचणारी हानी ही नैसर्गिक महासाथीपेक्षाही जास्त असेल, असा इशारा त्यांनी दिला.
बिल गेट्स म्हणाले होते, “पुढील काही दशकात युद्ध नव्हे तर असा व्हायरस 10 दशलक्ष लोकांचा जीव घेऊ शकेल, मिसाईल नाही तर मायक्रोब्स कोट्यवधी लोकांचा जीव घेईल. कारण आपण अशा महामारीवर मात करण्यासाठी तयारी केलेली नाही”
बिल गेट्स यांनी 2015 साली कोरोनाव्हायरसबाबत केलेली भविष्यावाणी आता खरी ठरते आहे. बिल गेट्स यांनी सांगितल्याप्रमाणेच कोरोनाव्हायरस कोणत्याही युद्धापेक्षा जास्त लोकांचा जीव घेतो आहे.
अगदी बलाढ्य देशांचीही कंबर त्याने मोडली आहे. टेड टॉक कार्यक्रमात त्यांनी ही भविष्यवाणी केली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या नव्या संकटांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे.