संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘या’ मंत्र्याचा नंबर लागणार? भाजपच्या बड्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

815
kirit-somaiya

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर एकदम राज्यातील राजकिय वातावरण बदलले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता सीबीयाईकडून केली जाणार आहे.

त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी आणखी एक मोठे खळबळजनक वक्तव्य करून नवा गौप्यस्फोट केला आहे.

त्यांनी संजय राठोड गेले (Sanjay Rathore), अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेले आता अनिल परबही ( Anil Parab) जातील. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील, असा खळबळजनक दावा केला आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.

संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले अनिल परबही जातील. सरकारच्या मंत्रिमंडळातले अर्धा डझन अनेक प्रकरणात गुंतलेले आहेत. त्यामुळे या मंत्र्यांना घरी जावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

किरीट सोमय्यांची सातत्याने टीका

शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूनंतर अनेक आरोप केले गेले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

राठोड यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. विरोध वाढल्यामुळे तेव्हा संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर दररोज 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांचासुद्धा राजीनामा घेण्याची मागणी केली जात होती. ही मागणीही सोमय्या यांनी सातत्याने लावून धरली होती.

यासोबतच सोशल मीडियातून या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी मंत्री व महाविकास आघाडी सरकारवर सातत्त्याने टीका केली होती. ट्वविटर, फेसबुक तसेच अन्य माध्यमांचा वापर करुन त्यांनी अनिल देशमुख तसेच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांतर आता सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचा उल्लेख करुन तेसुद्धा लवकरच जातील असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

सोमय्या यांनी असे वक्तव्य का केले ?

किरीट सोमय्या यांनी यानंतरचा नंबर अनिल परब यांचा असणार आहे, असे थेट वक्तव्य परब यांचे नाव घेऊन केले आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल परब का? यावर अनेकांनी विविध तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे.

सोमय्या यांनी परब यांचे थेट नाव नेमके का घेतले ? असा महत्त्वाचा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, सोमय्या यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याची उत्सुकता राज्याला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here