पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या !

216

नगर जिल्ह्यातील जामखेड येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या पत्नीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या पतीनेही कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेमुळे जामखेड शहरात खळबळ उडाली आहे शिल्पा अजय जाधव (वय 28) यांनी जामखेड येथील बीड रोडवरील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती तिचा नवरा अजय काचरदास जाधव (वय ३२) यांना समजताच कंपनीच्या कार्यालयात त्यांनी आत्महत्या केली.

पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याने त्याच प्रकारे गळफास लावून आत्महत्या केली. त्याच दिवशी दोघांनी एका तासाच्या आत आपले जीवन संपवले, यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. अजयने एक पत्र लिहून म्हटले आहे की त्याच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, परंतु या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

अजय आणि शिल्पाचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे जोडपे बीड रोडवरील आदित्य गार्डनच्या शेजारी राहत होते. शिल्पाने दुपारी घरात गळफास लावून घेतला. त्यावेळी तिचा नवरा कार्यालयात होता. तिच्या आत्महत्येनंतर शेजारी जमले. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची खबर दिली होती. तिने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या नवऱ्याला देण्यात आली होती पण घरी न येताच तिने स्वत: ला कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकापाठोपाठ दोघांनी आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव यांनी जामखेड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. अजयचा एक मोठा मित्र परिवार होता. लग्नाच्या काही महिन्यांतच या दोघांनी आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here