पुण्यात एका एअरहोस्टेस तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीला बळजबरीने मद्य पाजण्यात आले. त्यानंतर तिला बेदम मारहाणही करण्यात आली.
पीडित मुलीवर सध्या पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २७ डिसेंबरला हा धक्कादायक प्रकार घडल्याचं पिंपरी पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
सदर एअरहोस्टेस तरुणी आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाची ओळख २६ डिसेंबरला एका डेटिंग अॅपवरुन झाली होती. त्यानंतर या तरुणाने तिला हिंजवडी भागात भेटायला बोलावलं होतं.
तरुणी हॉटेलवर भेटण्यास राजी न झाल्याने हा तरुण तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारहाणही केली अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.