लखनऊ : प्रेमप्रकरणात अनेकदा वयात आलेली मुलं मुली घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे पालकांची अनेकदा कोंडी होते. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
एक मुलगी एकावेळी एकत्र चार जणांसोबत घरातून पळून गेली. मात्र लग्न कोणासोबत करावं हेच नेमक तिला कळत नव्हते. शेवटी या प्रकरणात विचित्र पद्धतीने वर परीक्षण करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी परीसरातील एक तरुणी चार तरुणांसोबत लग्न करण्यासाठी घरातून पळून गेली. या तरुणांनी दोन दिवस त्या तरुणीला आपल्या नातेवाईकांकडे लपवून ठेवले.
मात्र, दोन दिवसांनंतर या तरुणीला शोधण्यात तिच्या आई-वडिलांना यश आले. त्यानंतर हे प्रकरण पंचायतीकडे निवाड्यासाठी गेले.
निवाड्यावेळी पंचायतीने लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्या तरुणीला जेव्हा लग्नासाठी विचारण्यात आलं तेव्हा मात्र, ती नक्की कोणासोबत लग्न करायचे या संभ्रमात पडली.
विशेष म्हणजे चार तरुणांपैकी एकही तरुण लग्न करण्यासाठी स्वत:हून तयार झाला नाही, त्यामुळे या प्रकरणातील पेच आणखी वाढला.
तरुणी आणि चारही तरुणांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला, मात्र ते कोणताही निर्णय घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पंचायतीने चिट्ठ्या उधळून लग्नाचा निर्णय घेतला.
या वेळी चारही तरुणांच्या नावाच्या चिट्ठ्या उधळण्यात आल्या, आणि ज्या तरुणाचं नाव चिट्ठीत येईल त्याच्यासोबत तरुणीला लग्न करावं लागेल असा निर्णय सर्वांच्या अनुमतीने घेण्यात आला.
दरम्यान, संपूर्ण परीसरात सध्या तरुणीची आणि तिच्या लग्नासाठी घेण्यात आलेल्या अजब वर परीक्षणाची चर्चा रंगत आहे.