फडणवीसांना दिलेला ‘शब्द’ अजित पवारांनी खरा करून दाखवला

162
अजित पवार देवेंद्र फडणवीस

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त व्हिडिओ एडीट करून समाजमाध्यमावर पसरवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.

संबंधित व्यक्तीवर वाकड पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी युवराज दाखले नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी युवराज दाखले अजित पवार देवेंद्र फडणवीसयाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेला एक व्हीडिओ युट्युबवर प्रसारित केला होता.

दरम्यान, हे प्रकरण थेट विधानभवनात चर्चेला उपस्थित करण्यात आलं. विशेष म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

एका 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पुरावा नसतानाही आक्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमात पसरवुन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करून बदनामी केल्याबद्दल भारतीय दंड विधान कलम 500 व कलम 294 नुसार वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी पोलिसांनी आरोपी युवराजला बेड्या ठोकल्या आहेत.

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजपचे आमदार आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी केलेला उल्लेख काढुन टाकण्यात आला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. यासंबंधी आजच कारवाई करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना दिले होतं.

उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दानुसार त्याचदिवशी कारवाई करण्यात आल्याने पवारांनी आपला शब्द पाळला अशी चर्चा राजकीय वर्तुळात त्यांच्या समर्थकांकडुन करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here