पुणे : अजित पवार कायम ‘ऍक्शन’ मोड मध्ये असतात, थोडे मनाविरुद्ध झाले की भडकतात.
अजित पवार आधी काम मग बाकीच्या गोष्टींना महत्व देतात, याची प्रचिती पुन्हा पहायला मिळाली.
घडले असे की, राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला.
हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते.
कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजित पवारांचा पारा चढला.
यावेळी मी सत्कार स्वीकारत बसलो काम कोण करणार असे म्हणत कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका बैठकांच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते.
यावेळी कोणतीही पूर्व कल्पना न देता शेकडो कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित झाले.
यावेळी पवार यांच्या शिस्तीच्या स्वभावाचं दर्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच घडले.
पवारांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर ते खूपच चिडले.
अरे मी काम करू की सत्कार स्वीकारत फिरू, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले होते.
गावकर्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार होते.
अजित पवारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली.
एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले.
आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल.
मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजित पवार यांनी केला.
यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षाभंग झाला.