करोना चालू असतानाच ‘बर्ड फ्लू’ने डोके वर काढल्याचे समोर येऊ लागले आहे.
जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला नसला तरी, अहमदपूर तालुक्यातील केंद्रवाडी येथे अज्ञात आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कोंबड्यांचा कोणत्या आजाराने मृत्यू झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट न झाले नाही.
सदर रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केंद्रेवाडी गावाच्या १० किमी परिसरात ‘अलर्ट झोन’ जाहीर केला आहे.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केंद्रेवाडीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होत नाही.
तोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
केंद्रेवाडी गावात वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे.