धनजंय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप | पोलिसात तक्रार

377

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा धनंजय मुंढे अडचणीत सापडले आहेत.

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे  यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत त्यांच्या मेहुनीने पोलिसांत धाव घेतली आहे.

ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला सांगितले.

मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे.

याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली.

११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते.

पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here