महाराष्ट्रात तीन चारी ऑटो रिक्षा सरकार तयार झाले आहे. सत्तेसाठी शिवेसनेने सिद्धांत मोडले आहे. शिवसेना नेहमी म्हणत असते की, आम्ही वचन मोडले.
आम्ही वचन तोडले असे खोटे बोलत आमच्या मित्राने आमच्यासोबत दगाबाजी केली आहे. आम्ही महाराष्ट्रातसह देशभरात जे जे वचन दिले ते पूर्ण केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात अमित शाह यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना शहा म्हणाले कि, बिहारमध्ये नितीश यांना वचन दिले होते. ते आम्ही पूर्ण केले. मी कोणतेही वचन हे सर्व जनतेसमोर देत असतो.
तुम्ही म्हणता मी बंद खोलीमध्ये वचन दिले, पण मी बंद खोलीत राजकारण करत नाही, मी सर्वांसमोर वचन देतो. मी डंके की चोट पर… सर्व काही करतो !
राजकारणासाठी सिद्धांत मोडले
यासोबतच शिवेसनेने राजकारणासाठी सिद्धांत मोडले आहे असा टोलाही अमित शाहांनी लगावला आहे. याविषयी बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंच्या फोटोवर मोदींचे भलेमोठे फोटो लावून तुम्ही मते मिळवली आहेत.
-
मी शिवसेनेच्या मित्रांना म्हणेल की, तुम्ही सिद्धांतासाठी राजकारण करत नाही. तुम्ही राजकारणासाठी सिद्धांत मोडत आहात. आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही तुम्ही काळजी करु नका. आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असते तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.’
शाह म्हणाले की, ‘महाराष्ट्रात ऑटो रिक्षासारखे तीन चाकी सरकार बनले आहे. ज्याचे तीनही चाके वेगवेगळ्या दिशेने चात आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने जात आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. जनतेने हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता.
राणेंचा सन्मान कसा करायचा हे भाजपला चांगले माहीत आहे : शहा
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे हे असून जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
शिवसेना ही आयत्या बिळावर नागोबा : नारायण राणे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नारायण राणे म्हणाले की, ज्यावेळी आम्ही सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हाच विचार केला होता की, रुग्णालयाचे उद्घाटन अमित शहांच्या हस्तेचं करणार!
मेडिकलच्या प्रकल्पात शिवसेनेने विरोध केला. त्यांनी जागा घेण्यास विरोध केला. विकासाला विरोध करणे म्हणजेच शिवसेना आहे. शिवसेना ही आयत्या बिळावर नागोबा आहे असे म्हणत नारायण राणेंनी निशाणा साधला आहे.
कोरोना काळात राज्यात चांगले काम झाले नाही : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्राची काय अवस्था झाली हे सांगण्याची आवश्यकता नाही. नुकताच संसदेत आर्थिक अहवाल मांडला.
ज्या राज्यात कोविड काळात अत्यंत कमी काम झाले ते राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प महाराष्ट्रातला असताना येथे चांगले काम झाले नाही. येथे सर्वात जास्त रुग्ण होते. पण आम्ही राजकारण केले नाही.
आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहिलो. पण मला असे वाटते की, पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राची कोरोनात एवढी वाईट अवस्था का झाली याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे.