अमृता सिंहचा 63 वा वाढदिवस | अमृता सिंहसोबत लग्नाच्या वेळी फक्त 21 वर्षांचा होता सैफ

304

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह आज आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृताने 80-90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र ती आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. (Bollywood actress Amrita Singh Celebrates her 63rd Birthday Today)

सनी देओल, रवी शास्त्री, विनोद खन्ना यांच्यासोबत अमृता एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होती. 

मात्र नंतर तिने स्वतःपेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न थाटून सगळ्यांना हैराण केले होते. मात्र दोघांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

घटस्फोटानंतर तब्बल 16 वर्षांनी सैफने त्याच्या मनातील सल पहिल्यांदा बोलून दाखवली होती. 2020 मध्ये एका मुलाखतीत सैफने मुलाखतीत घटस्फोटाबद्दलचे दुःख बोलून दाखवले.

या मुलाखतीत सैफ भावूक झाला होता आणि त्याने ही जगातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे म्हटले होते. पिंकविला वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सैफने अमृतासोबतच्या घटस्फोटावर म्हटले होते, ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे.

Image result for सैफ and अम्रिता

जे काही घडले त्यापेक्षा काहीतरी वेगळे व्हायला हवे होते. मला वाटतं नाही या गोष्टीचा ताण कधी कमी होईल. काही गोष्टी आपल्याला शांतता देत नाहीत त्यातीलच ही एक गोष्ट आहे.’

पुढे सैफ म्हणाला होता की,’मी तेव्हा फक्त 21 वर्षांचा होतो. आज गोष्टी खूप बदलल्या आहेत. आपण कायमच विचार करतो की, आई-बाबा दोघे कायम एकत्र राहतील.

मात्र ती दोन्ही वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत. आज आपण मॉर्डन रिलेशनशिपबद्दल बोलतो. कोणत्याही मुलाला आपल्या घरातील उबदार वातावरणापासून वंचित ठेवायला हवे.’

मुलांना चांगले वातावरण मिळणे गरजेचे

पुढे मुलाखतीत सैफला इब्राहिम आणि साराबद्दल विचारण्यात आले तेव्हा सैफ म्हणाला की,’कोणत्याही मुलाला त्याच्या घरापासून, कुटुंबापासून असं सहज दूर करता कामा नये.

या सगळयांचा मुलांवर खूप वाईट परिणाम झाला. अनेकदा परिस्थिती वेगळी असते. पालक एकत्र नसल्यावर अनेक गोष्टी समोर येतात. अशावेळी एक स्टेबल घर आणि वातावरण मुलांना मिळणे खूप गरजेचे आहे.’

2004 मध्ये झाला होता घटस्फोट

सैफ अली खानने 1991 मध्ये त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृतासोबत लग्न केले होते. दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. सैफ आणि अमृता सिंह लग्नाच्या 13 वर्षांपूर्वी घटस्फोट घेऊन वेगळे झाले.

2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 2012 मध्ये सैफने त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरसोबत लग्न केले. दोघांना तैमूर हा मुलगा असून करीना लवकरच आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here