अमृत योजनेचे हडोळतीमध्ये काम रोखले | रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर काम पुन्हा सुरू

284

अहमदपूर : अमृत योजनेअंर्तगत लिंबोटी (जि. नांदेड) येथील मध्यम प्रकल्पातून उदगीरला करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

या जलवाहिनीच्या कामासाठी हडोळती येथील मुख्य रस्ता खोदण्यात येणार असल्याने संभाव्य त्रास व नुकसानीबाबत दाद मागण्यासाठी सदर काम बंद करण्याचा निर्णय हडोळतीकरांनी घेतला होता.

पावसाळ्यात रस्ता खोदला तर त्रास होईल, तेव्हा हे काम बंद करावे अशी नागरिकांची तक्रार होती. याबाबत लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उदगीर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी भरत राठोड, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक अॅड. दत्ता पाटील, ताहेर हुसेन, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कायंदे, उदगीर विभागाचे एस. बी. नागरगोजे, नगरपालिकेचे कटके, तेजस कंन्स्ट्रक्शनचे अभियंता गणेश पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच हडोळती येथे बैठक झाली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी तांत्रिक अडचणीबरोबर रस्त्याचे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून देण्याचे उदगीर नगरपालिका व तेजस कन्स्ट्रक्सनच्यावतीने लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर नागरिकांनी सदर रस्ता खोदकाम करण्यास अनुमती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here