एक अधुरी प्रेम कहाणी : बॉबी देओलच्या प्रेमात अभिनेत्री नीलम पुरती वेडी झाली होती !

445
An unfinished love story: Actress Neelam was madly in love with Bobby Deol!

सुमारे तीस एक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्या काळात बॉलीवूडमध्ये अभिनेत्री नीलमचेच राज्य होते. प्रत्येक सिनेमागणिक तिची कारकीर्द बहरत होती.

नीलम स्टार अभिनेत्री बनण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू होती. आणि त्याच वेळी तिच्या मनातही बरीच उलथापालथ चालली होती. बॉलीवूडमध्ये कित्येक सेलेब्रिटी एकमेकांच्या प्रेमात पडतात.

रोज नवीन जोड्या बनतात, काही जोड्या तुटत असतात. काही प्रेम कथा पुऱ्या होतात, तर कित्येक कहाण्या अधुऱ्या राहून जातात. त्या गोष्टी कधीच पूर्ण होत नाहीत. फक्त त्यांची चर्चा होते, गॉसिप म्हणून पाहिले जाते.

बॉलीवूडमध्ये अशीच एक अधुरी कहाणी अभिनेत्री नीलम आणि अभिनेता बॉबी देओल यांची आहे. या दोघांच्या प्रेमाचे गुलाबी किस्से तेव्हाच्या फिल्मी पुरवण्या आणि मासिकांतून सतत चर्चेत येत असत, पण या दोघांच्या नात्याला पूर्णत्व मिळाले नाही.

अतिशय गोड चेहऱ्याची अभिनेत्री नीलम १९८४ साली ‘जवानी’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये आली. यानंतर नीलमने सुपरस्टार गोविंदा ह्याच्यासोबत मस्त जोडी जमवली होती.

नीलमचं करिअर हळूहळू आकार घेत होते आणि त्याचवेळी तिच्या मनातही कोण्या राजकुमाराची एंट्री होत होती. लाखो तरूणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या नीलमच्या बॉबीसोबतच्या अफेअरच्या बातम्या तेव्हा जोरात येत होत्या. अनेक जाणकारांच्या मते बॉबी आणि नीलम जवळपास पाच वर्षं एकमेकांना डेट करत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेमही होते, तरीसुद्धा त्यांच्या लव स्टोरीचा शेवट सुखद झाला नाही.

त्यावेळच्या बातम्यांनुसार, बॉबी नेहमीच त्याचा मोठा भाऊ, सनी देओल याच्या सिनेमाच्या सेटवर शूटिंग बघण्यासाठी म्हणून जात होता. तिथेच त्याने नीलमला पहिल्यांदा बघितले आणि तिच्या प्रेमात पडला होता.

नीलम तेव्हा सनीसोबत हिट सिनेमे देत होती. सनीच्याच सिनेमांच्या सेटवर त्यांच्या भेटी होऊ लागल्या. बॉबी व नीलम यांची आधी मैत्री आणि मग प्रेम अशा मार्गाने त्यांच्यात नाते फुलत गेले.

प्रेमात पार बुडून गेलेले नीलम आणि बॉबी त्यांच्या नात्याबाबत खूप सजग आणि गंभीर होते. त्यांना लग्न करण्याची इच्छा होती. पाच वर्षं ते एकमेकांसोबत होते आणि मग एक दिवस अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली.

तेव्हा अशी खबर होती की बॉबीचे वडील अभिनेता धर्मेंद्र यांच्यामुळे नीलम-बॉबीला वेगळे व्हावे लागले होते. धर्मेंद्रला त्या दोघांचे नाते पसंत नव्हते. मात्र नीलमने या बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले होते.

फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीलमने सांगितले होते की, बॉबी आणि ती यांच्यात नाते उरले नसल्याची बातमी खरी आहे. पण तिला खासगी गोष्टींची जाहीर चर्चा व्हावी असे वाटत नव्हते.

मात्र त्यांच्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा खोट्य होत्या, धर्मेंद्र किंवा अन्य कोणाचा हे नाते संपण्यात हात नाही. हे नातं आणखी पुढे जाऊ शकणार नाही असे वाटल्यामुळे त्यांनी परस्पर समजुतीने ब्रेकअप केले असल्याचे तिने सांगितले होते.

मात्र या प्रकरणानंतर नीलम मानसिकरीत्या खचली होती. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर तिने सनीसोबत ‘पाप की दुनिया’ या सिनेमात काम केले होते आणि बॉबीसोबत असलेलं नाते संपल्यामुळे सनीसोबत असलेली मैत्री तुटणार नाही असेही तिने स्पष्ट केले होते. काही सिने समीक्षकांच्या मते सनीने नीलम पासून बॉबीला दूर ठेवले होते.

नीलमने नंतर ऋषी सेठीया या उद्योजकाशी लग्न केले होते. मात्र २००० साली त्यांचा घतस्फोट झाला. त्यानंतर २०११ साली अभिनेता समीर सोनी याच्याशी तिने लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी २०१३ साली नीलम आणि समीर या दोघांनी ‘आहना’ नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

नीलम व्यवसायाने आता ज्वेलरी डिझायनर असून तो तिच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय आहे. फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाईव्हज नावाच्या एका शोमध्ये ती दिसली होती. नीलम पुन्हा एकदा सिनेमातून दिसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here