Anil Deshmukh Vs Parambir Singh : राजकीय ड्रामा, अधिकाऱ्यांचे ब्लॅकमेल आणि 100 कोटींचे सस्पेन्स | गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ‘सरकारी उत्तर’

282

परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक व गंभीर आरोप केले आहेत.

अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायचे ‘टार्गेट’ दिले होते, असा आरोप करत सिंग यांनी एकचं खळबळ उडवून दिली आहे.

आयुक्त पदावरून दूर करण्यात आल्यानंतर सुट्टीवर गेलेल्या सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र लिहून राज्यात राजकीय ‘टोटल धमाल’ उडवून दिली आहे.

परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख ‘अडचणीत’ आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. आज राज्यभरात यासाठी आंदोलन केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे, तर अनिल देशमुख यांनी सर्व आरोप खोटे आहेत असा खुलासा करीत होणारे आरोपचं फेटाळून लावले आहेत.

त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अब्रुनुकसानीचा दावा दाखला करणार असल्याचे म्हटले आहे.

अनिल देशमुख यांचं प्रसिद्धीपत्र

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. 
  • सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? 
  • आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली.
  • हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 
  • 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
  • पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. 
  • परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. 
  • स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
  • सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? 
  • विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. 
  • स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे 
  • मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here