Anita Hasanandani Gives ‘Good News’ | अभिनेत्री अनिता हसनंदानीने सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा गोंडस चेहरा

216

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी मंगळवारी 9 फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला. अनिताच्या मुलाचा पहिली झलक समोर आली आहे. 

ज्यात अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी आपल्या  घरी  आलेल्या नवीन पाहुण्याला घेऊन खूप उत्साहित आहे. हॉस्पिटलच्या आतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये अनिता आणि तिचा पतीच्या चेहर्‍यावरील हास्यानेच कळतंय की ते दोघे किती आनंदी आहेत. 

 

याच फोटोंमध्ये मुलाची एक झलकसुद्धा दिसतेय.  एल्फा वर्ल्ड हँडलवरून शेअर केलेल्या या फोटोत बाळाची पहिली झलक फोनच्या स्क्रीनवर दिसली आहे.

रोहितने अनितासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. चाहते अनिता आणि रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत.

प्रेग्नेंन्सी दरम्यान अनिता आपल्या बेबी बॅम्पचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डीसर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही.

 


अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.’कभी सौतन, कभी सहेली’, ‘ये हैं मोहब्बते’, ‘नागीन 3’ या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात.

2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते.लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here