लातूर : महापुरुषांची जयंती प्रत्येक समाजातील कुटुंबाने घराघरात साजरी करावी व महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे. सध्या कोविडचे संकट वाढत आहे, त्यामुळे स्वतः सोबत समाजाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. समाज व स्वतःच्या हितासाठी महापुरुषांना घरी राहूनच अभिवादन करावे.
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता रस्त्यावर येऊन जयंती साजरी करुन कोरोना काळात स्वतःचा व समाजाचा जीव धोक्यात घालू नये.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, जेणे करुन समाजाला फायदा होईल असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी (आज दि.१०) उदगीर येथे केले.
महात्मा ज्योतिबा फुले जयंती, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बसवेश्वर जयंती साजरी करण्यासंबंधी शांतता समितीच्या बैठकी संदर्भात उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे बोलत होते.
या वेळी शांतता समितीच्या बैठकीस उपस्थित जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी उपविभागीय पोलीस अधिक्षक जॉन डॅनिअल बेन, तहसीलदार रामेश्वर गोरे, बस्वराज पाटील नागराळकर, निवृत्ती सांगवे, राजकुमार भालेराव, मधुकर एकुर्केकर, अविनाश गायकवाड, साधु लोणीकर, शशिकांत बनसोडे, गौतम कांबळे, राहुल कांबळे इत्यादी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, नागरीकांनी कोरोना नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. या विपरीत काळात प्रशासनास सहकार्य करून शांततेत घरीच जयंती साजरी करावी.
शासनाने दिलेले निर्बंध काटेकोरपने पलान करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रस्त्यावर येऊन जयंती साजरी सामाजिक आरोग्य व स्वतःचा जीव धोक्यात आणू नये. त्यापेक्षा रक्तदान शिबीराचे आयोजन करावे जेणे करुन समाजाला त्याचा फायदा होईल; असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.