बदायूं : एका 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर (5 Years Old Girl Rpe) अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने या चिमुरडीला आपल्या वासनेचा बळी बनविले.
हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर संबंधित मुलीची गळा आवळून खून केला. यानंतर काही स्थानिकांनी आरोपीला घटनास्थळी पकडले आणि बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी युवकाला अटक केली. (Spot and Arrested the Acused)
उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात ही घटना घडली. इथल्या खेड्यातील एक निरागस 5 वर्षाची मुलगी आईसह शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आईपासून काही अंतरावर खेळत होती.
पीडितेला मुलीला एकटे पाहून नराधम आरोपीने तिच्यावर अमानुष बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी तिचा गळा दाबून खून केला. त्याच वेळी, शेतीकडे जाणाऱ्या काही ग्रामस्थांनी संबंधित प्रकार पाहिले. तेव्हा पीडित मुलगी तिथे मृत अवस्थेत आढळली.
तर ग्रामस्थांनी 30 वर्षीय आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. दरम्यान, एका गावकऱ्यांने पोलिसांना घटनेची माहिती दिली. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी युवकास अटक केली.
ग्रामस्थांचा आक्रोश पाहून पोलिसांनी तातडीने पीडित मुलीचा मृतदेह घटनास्थळावरून काढून शवविच्छेदनासाठी पाठविला.
या प्रकरणात एसएसपी संकल्प शर्मा म्हणाले की, 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीला अटक करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.