मुंंबई : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
येथे सामूहिक बलात्कार पीडित महिला आता तीन गावांसोबत लढाई करीत आहे.
सामूहिक बलात्काराचे चार आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतर आता पीडितेच्या गावासह जवळील दोन गावांनी पीडितेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस सध्या या प्रकारणाची चौकशी करीत आहे.
पीडितेच्या गावातील ग्राम पंचायतीकडून अशा प्रकारची नोटीस लावण्यात आली आहे. यानुसार पीडित महिलेचा गावत बहिष्कार केला जातो.
सामूहिक बलात्कार पीडिता 2015 पासून आपली लढाई लढत आहे.
पाच वर्षांनंतर 2020 मध्ये या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
मात्र त्यानंतरही महिलेचा त्रास संपला नाही. केवळ महिलेच्या गावातील नागरिकांनाही बहिष्कार टाकला नाही. तर गावाजवळील दोन गावातही पीडितेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीडितेनं सांगितलं की, ग्राम पंचायतीचे लोक धमकी देत आहेत. तू तर गावातील लोकांविरोधात तक्रार करीत त्यांना शिक्षा देण्यास भाग पाडले आहे.
त्यामुळे तू गावात का राहते. तिच्या घराबाहेर नोटीस लावण्यात आली आहे. त्यानंतर पीडितेने पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ उडाला होता. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला खोटी केस दाखल करण्याची धमकी देते.
त्यामुळे तिच्यावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी सांगितलं की, गावात प्रत्येक व्यक्तीला राहण्याचा अधिकार आहे.
मात्र विनाकारण जर कोणावर कारवाई झाली तर आम्ही त्याचा विरोध करू असे म्हटले.
पोलिसांनी आपल्या तपासात गावकऱ्यांची बाजू ऐकून निर्णय घ्यायला हवा. अद्याप या प्रकरणात कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.