संतापजनक : ऑक्सिजनच्या बदल्यात केली ‘भलतीच’ मागणी ! सोशल मीडियावर संतापाची लाट?

493

कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य माणसांची परवड सुरू आहे. सरकार आणि जनता ऑक्सिजनसाठी जीवापाड संघर्ष करीत आहेत. कोरोना संकट नवीन असल्याने सरकार व प्रशासन हतबल ठरत आहे.

डॉक्टर व हॉस्पिटलमध्ये रुग्ण बेहाल आहेत. काही डॉक्टर व हॉस्पिटलचा अपवाद वगळता पहिल्या लाटेतील सहानुभूती दुसऱ्या लाटेत पुरती गमावून टाकली आहे. पहिल्या लाटेतील देवदूत दुसऱ्या लाटेत यमदूत असल्याचे बोलले जात आहे.

रुग्ण आणि कुटुंबातील सदस्य ऑक्सिजन, रेमेडिसिवर शोधण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहेत. काही नराधमांनी या संकटातही आपली राक्षसी प्रवृत्ती सोडले नाही. चक्क बनावट रॅमिडीसीवर तयार करून हजारो लोकांना लुटले आहे.

कोरोना काळात माणुसकी आणि राक्षसी प्रवृत्ती याच्यातील दर्शन वारंवार झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन अनेक नराधमांनी मानवतेला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहेत, अशीच एक संतापजनक घटना सोशल मीडियावर खूप जोरात वायरल होऊ लागली आहे.

कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही संतापजनक घटना त्या मुलीच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर मांडुन या घटनेला वाचा फोडली आहे. जेव्हा ही घटना ट्विटरवरून उजेडात आली तेव्हापासून प्रकाराविरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सदर तरुणीच्या एका मैत्रिणीने पीडित तरुणीची बाजू ट्विटरवर मांडली आहे.

ती त्याला वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या गरीब मुलीच्या वाट्याला आलेल्या या प्रकाराबाबत एका तरुणीने सोशल मीडियातून वाचा फोडली आहे. या तरुणीने पीडित मुलीला लहान बहिण म्हणून संबोधले आहे. पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेत होती.

त्याचवेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सच्या बदल्यात त्या मुलीकडे निर्लज्जपणे ‘सेक्स’ची मागणी केली. अत्यंत घाणेरड्या भाषेत त्या व्यक्तीने पीडित मुलीकडे ऑक्सिजनच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. जेव्हा ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आली त्यानंतर त्या व्यक्तीने सदर लैंगिक छळवणुकीचा आरोप फेटाळून लावला आहे.

या नराधमाचे काय करावे. एखाद्या असहाय मुलीने व महिलेने अशा प्रसंगी काय करायचे? असा सवाल हा प्रकार उजेडात आणणाऱ्या भावरीन कंधारी या तरुणीने सोशल मीडियातून उपस्थित केला आहे. माझ्या मित्राच्या बहिणीच्या बाबतीत हा कटु अनुभव घडल्याचे तिने निदर्शनास आणून दिले आहे.

तिने यासंदर्भात ट्विट करताच सोशल मीडियातील हजारो तरुण-तरुणींनी या प्रकारावर चीड व्यक्त केली. तसेच नराधमाला कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली आहे. पीडित तरुणीच्या बाजूने अनेक नेटिझन्स उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

भावरीन कंधारी या तरुणीच्या ट्विटनंतर सोशल मीडियात कोरोना महामारीतील अत्याचाराविरोधात ऑनलाईन चळवळच उभी राहिली आहे. नराधमाचे नाव जाहीर करून त्याची समाजात उजळ माथ्याने फिरतोय त्याचा चेहरा समाजासमोर आला पाहिजे. त्याच्या अब्रुचे धिंडवडे काढून पोलिसांच्या स्वाधीन केले पाहिजे, तर अनेकजणाणी याबाबत पोलिसांकडेच रितसर करून कठोर शिक्षा देण्याचा पर्याय योग्य असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.

याचवेळी अनेकांनी पीडित मुलीला न्याय मिळेल की नाही, याबाबतही शंका उपस्थित केली आहे. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केला आहे. पोलिस वेळकाढू धोरण अवलंबतील. त्यामुळे गुन्हा सिद्ध होईल की नाही, तसेच पीडितेला न्याय मिळेल की नाही, याबाबत शाश्वती देता येणार नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here