चिंता वाढली | कोरोनाच्या पहिल्या स्ट्रेन पेक्षा नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणे अधिक धोकादायक

528
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या रोज एक लाखांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत.

खोकला, ताप, वास न  येणे, चव न समजणे ही कोरोना व्हायरसची काही सामान्य लक्षण आहे. पण आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकुळ घातला आहे.

कोरोनाच्या या स्ट्रेनची लक्षणे जुन्या स्ट्रेनच्या तुलनेत कशी वेगळी आहेत हे आता आपण जाणून घेऊया.

  • डोळे : चीनमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून दिसून आले की कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर रुग्णाचे डोळे लाल किंवा गुलाबी दिसत आहेत. याशिवाय सुज, डोळ्यातून पाणी येणं या समस्यांचा ही सामना करावा लागत आहे.
  • कान : इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडिओलॉजीमध्येय प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना संक्रमित रुग्णांना कानाशी संबंधित संक्रमणाचा सामना करावा लागत आहे.
  • तुम्हालाही अशी समस्या जाणवत असतील तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे लक्षण असू शकते अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे कधीही चांगले.
  • पोट : नवीन स्ट्रेनमध्ये संशोधकांनी गॅस्ट्रोइंटेन्साईनल लक्षणं जाणवत असल्याचं सांगितले आहे, सुरूवातीला रुग्णाला अपर रेस्पिरेटरी सिस्टिमची समस्या जाणवत होती.
  • आता पोटाशी निगडीत समस्या समोर येत आहेत. नवीन स्ट्रेनमध्ये लोकांना उल्टी, पोटदुखीसह पचनाच्या इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
  • मेंदू: कोरोनाच्या नवीन स्ट्रेननं संक्रमित लोकांमध्ये न्यूरोजॉलिकल डिसॉर्डरची समस्याही पाहायला मिळत आहे.
  • medRxiv च्या रिपोर्टनुसार  दीर्घकाळ कोरोना संक्रमणाचा सामना करत असलेल्यांना ब्रेन फॉग किंवा मेंटल कंफ्यूजनचा सामना करावा लागू शकतो. 
  • हृदय : जर तुम्हाला अनेक दिवसांपासून असामान्य हार्ट बीट जाणवत असतील तर दुर्लक्ष करणं महागात पडू  शकते.

मायो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार नवीन स्ट्रेनच्या जाळ्यात अडकल्यानंतर हृदयाचे ठोके वेगाने पडू लागतात. जामा जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार जवळवास ७८ टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर ६० टक्के लोकांना मेयोकार्डिएल इंफ्लेमेशनचा सामना करावा लागत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्यामते कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला चढवत आहे. नवीन स्ट्रेन खूप जास्त संक्रमक असल्यामुळे फुफ्फुसे आणि श्वसन तंत्रात सहज पसरत आहे.

कोरोनाच्या आधीच्या स्ट्रेनचे संक्रमण झाल्यानंतर सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, चव, वास न समजणं, शिंका येणे, घसा खवखवणे, हातापायांना सूज येणे ही लक्षणे जाणवत होती. मात्र नवीन स्ट्रेन माणसाच्या जीवाशी निगडित सर्वच अवयवांवर प्रहार करत आहे. यामुळे सर्वानी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here