ऑनलाईन अर्ज करा | शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून 1 ते 1.25 लाख रुपयांचं अर्थसहाय्य

222
agricultural tractors sub-campaign for tractors

मुंबई : सध्या शेतीमध्ये पारंपारिक औजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामे करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणे गरजेचे बनत आहे. 

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध करुन देत आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे.

लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला शेतकरी यांना 1 लाख ते 1.25 लाख तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते.

योजनेचा उद्देश

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअतंर्गत जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. हा मुख्य उद्देश आहे.

प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.

कोणते शेतकरी ट्रॅक्टरसाठी अर्ज करु शकतात ?

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा असावा. शेतकरी अनुसूचित. जाती , अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानाता लाभ घेतल्यास पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही. मात्र, इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी योजनावर क्लिक करावे.
  • पुढे कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा. पुढे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर लॉगीन तयार करावे.
  • त्यासाठी शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असणं बंधनकारक असून त्यांचं आणि मोबाईल नंबंरचं व्हेरिफिकेशन करावं लागते. लॉगीन करुन अर्ज भरावा लागेल.
  • लॉगीन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, शेती जमिनीची माहिती भरा.
  • लॉगीन केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील माहिती भरुन एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडून पुढे जावे.
  • शेतकऱ्यांनी कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्जसहाय्य हा पर्याय निवडावा. त्यानतर ट्रॅक्टर हा पर्याय निवडावा. पुढे जाऊन 2 डब्ल्यू डी किंवा 4 डब्ल्यू डी पैकी योग्य पर्याय निवडावा.
  • ट्रॅक्टरची एचपी श्रेणी निवडावी. सर्व माहिती भरुन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.
  • अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक निवडावा.त्यानंतर अर्जाची फी भरावी. यासाठी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात.
  • महाडीबीटी पोर्टलवरुन विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक शेतकरी-एक अर्ज या पद्धतीद्वारे एकचं अर्ज करणं अपेक्षित आहे.
  • त्यामुळे दुसरा अर्ज करता येणार नाही. परंतु पहिला अर्ज रद्द करुन पसंतीच्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्यानं एकच अर्ज करता येईल. त्यासाठी पहिला अर्ज रद्द करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here