इंजि.अनिलकुमार गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम सचिवपदी नियुक्ती

598

लातूर : लातूर जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र शासनाने दोन वेळा गौरवित केलेले इंजि. अनिलकुमार बळिराम गायकवाड यांची आज (दि.७) रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबईच्या सचिव (बांधकामे) या पदावर महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे.

इंजि.अनिल कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक महत्वाची पदावर काम केले आहे.

सध्या एमएसआरडीसीच्या हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे मुख्य अभियंता तथा सह व्यवस्थापकिय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे सचिव बांधकामेचा अतिरिक्त चार्ज सांभाळत होते.

उत्कृष्ट अभियंता म्हणून इंजि. अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. मुंबई मधले उड्डाण पुल, सी लिंक, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे, वैतरणा नदिवरील सर्वात ऊंच लोखंडी पूल, दिल्ली येथील सुंदर असे महाराष्ट्र सदनची वास्तू, मुंबई हायकोर्टाच्या इमारतीचे आधुनिक पद्धतीच नूतनीकरण आणि सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृध्दी महामार्ग असे अनेक प्रकल्प यशस्वी पूर्ण केलेले आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here