फोटोग्राफरवर अर्जुन असा काही बिथरला | बॉयफ्रेन्डचा ‘अँग्री’ अवतार पाहून मलायका अचंबित

218

रविवारी रात्री अर्जुन कपूर जाम भडकला. एका फोटोग्राफरवर अर्जुन असा काही बिथरला की, सगळेच हैराण झालेत. यावेळी अर्जुन कपूरसोबत मलायका अरोराही होती. ती देखील अर्जुंचा रागीट अवतार पाहून अचंबित झाली. 

बॉयफ्रेन्डचा हा अँग्री अवतार पाहून ती सुद्धा आश्चर्यचकित झाली. पूर्ण घटना अशी आहे कि करिना कपूर व सैफ अली खानच्या घराबाहरेची फोटोग्राफर फोटोसाठी अडवत होता. त्यावर अर्जुन कपूर भडकला.

अर्जुन व मलायका दोघेही काल रात्री सैफिनाच्या नव्या घरी त्यांच्या बाळाला पाहायला पोहोचलेत. अर्जुन व मलायकाची एन्ट्री होताच सैफिनाच्या घराबाहेर उभे असलेले फोटोग्राफर्स अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. कॅमेरे घेऊन पुढे सरसावले.

अर्जुन व मलायका कारबाहेर निघाले. याचदरम्यान घराबाहेर उभ्या असलेल्या एका फोटोग्राफर्सने भींतीवर चढण्याचा प्रयत्न केला.

भींतीवर चढून फोटो घेण्याचा आटापीटा करू पाहणा-या या फोटोग्राफरला पाहून अर्जुनचा पारा चढला. आधी त्याने त्याला खाली उतरण्याची विनंती केली.

तुम्ही बिल्डींगच्या आता असे येऊ शकत नाही. हे चूक आहे. विनंती आहे ही तुम्हाला, असे अर्जुन म्हणाला. पण तरीही फोटोग्राफर भींतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून मात्र अर्जुनचा पारा चढला. तुम्ही ऐकतच नाही आहात? असे म्हणून तो पुढे सरकरला आणि त्या फोटोग्राफर्सवर चांगलाच भडकला.

भाईसाहब, लाल शर्ट वाले, क्यों डर के भाग रहे हो? असे म्हणत त्याने आपला संताप व्यक्त केला. अर्जुन व मलायका दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आताश: हे कपल खुल्लमखुल्ला फिरताना दिसते. न्यू ईअरला हे कपल गोव्यात होते. त्यापूर्वीही अनेकदा हे कपल एकत्र व्हॅकेशनवर गेले आहे. (सर्व फोटो Instagram )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here